दिल्ली : प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले.देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल झाला.
कालच्या घटनेत ८६ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत ८६ पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत १७ खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत.
ट्रॅक्टर रॅली दरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेवर सर्वच राजकीय नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी देखील निंदा व्यक्त केली आहे. कालच्या घटनेमुळे आता शेतकरी आंदोलन फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे. वी एम सिंह यांच्या गटाने या आंदोलनातून माघार घेतली आहे.
‘उद्देश वेगळा असलेल्यांसोबत आंदोलन करू शकत नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो पण व्हीएम सिंह गट आता या आंदोलनातुन माघार घेत आहे. त्यांच्या आंदोलनाशी आता आमचा काहीही संबंध नाही. जोपर्यंत आम्हाला एमएसपीची हमी मिळत नाही तोपर्यंत निषेध सुरूच राहणार, परंतु या प्रकारे हे आंदोलन मी करू शकत नाही. लोकांना येथे शहीद करण्यासाठी किंवा मारहाण करायला आपण आलो नाही,’ असं व्ही एम सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
https://twitter.com/ANI/status/1354386582405488641?s=20
महत्वाच्या बातम्या
- महाभारताचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
- मुंबई लोकल २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता – महापौर
- प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचे शानदार उद्घाटन
- शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का; भाजपच्या माजी सचिवाने मातोश्रीत बांधलं शिवबंधन !
- आता सरकार आंदोलकांशी चर्चा करणार का ? जावडेकर स्पष्टपणे म्हणाले….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

