मुंबई : कोरोनाने राज्यासह देशभरात कहर माजवण्यास सुरुवात केल्यानंतर टाळेबंदीसह सार्वजनिक वाहुतक सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर, अनलॉक लागू करण्यात आला व सार्वजनिक वाहतूक देखील सुरु करण्यात आली. मात्र, मुंबईतील लोकलसेवा मात्र बंदच ठेवण्यात आली आहे.
जनजीवन सुरळीत झाल्यानंतर मुंबईकरांना दळणवळणाच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जानेवारीच्या पँझील्या आठवड्यात लोकल सुरु केली जाईल, असं सांगितलं होतं. मात्र, आता जानेवारी महिना संपत आला तरी सामान्य मुंबईकरांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन आढावा देखील घेतला होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली होती. लोकल प्रवास सामन्यांसाठी सुरु करण्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली होती.
आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी २९ जानेवारी वा १ फेब्रुवारीपासून लोकल सुरु होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. ‘ लोकलसंदर्भात चर्चेसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एक बैठक बोलावली आहे. नुकतंच यासंदर्भात एक वृत्त ऐकलं होतं आणि आज लगेच आम्हाला चर्चेसाठी बोलावलं आहे. मला वाटतं कदाचित 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून कदाचित मुंबई लोकलं सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे.’ असं भाष्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, ‘जरी लोकल सुरु झाल्या तरी लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. तोंडावरचा मास्क आणि हातात सॅनिटायझर तुमच्या जवळ असलं पाहिजे आणि सोशल डिस्टंन्सिग पाळणं गरजेचं आहे.’
महत्वाच्या बातम्या
- आता प्रवासात जास्तीच्या सामानाची चिंता नाही; रेल्वेने आणली नवी योजना !
- ते शेतकरी नव्हे,देशद्रोही; सदाभाऊ खोत यांनी डागली तोफ
- ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात संगनमत करून आर्थिक लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल करा- मनसे
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची ‘बी’ टीम; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
- शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

