औरंगाबाद : औरंगाबाद येथे ‘महाराष्ट्र देशा’ न्यूज पोर्टलच्या मराठवाडा विभागीय कार्यालयाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी रोजी करण्यात आले. शहरातील प्लॉट नं. ई 20, सिडको एन-4, आसावा क्लासेसजवळ, कामगार चौक येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या.
‘महाराष्ट्र देशा’ हे राज्यातील अग्रगण्य डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. पुणे येथे याचे मुख्य कार्यालय आहे. सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या औरंगाबाद शहरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र देशा’च्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त सुनील देशमुख (आयआरएस) यांची उपस्थिती होती. तर जीएसटीचे उपायुक्त अजित तोगरे (आयआरएस), सामाजिक कार्यकर्त्या सुनिता पाठक, नगरसेविका माधुरी अदवंत, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनिल सुतावणे, जेष्ठ साहित्यिक तथा समाजसेवक श्रीकांत उमरीकर, एन्जल किड्स स्कुलचे संस्थापक तुकाराम मुंढे, प्रा. निमा शिंदे, भाजप पदाधिकारी मनिषा भन्साली, विजयकुमार तोगरे, महाराष्ट्र देशाचे संचालक मनोज जाधव, संचालक अभिजीत दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
औरंगाबाद शहर हे मराठवाड्याची राजधानी आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या औरंगाबादला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. औद्यौगिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी ‘महाराष्ट्र देशा’ने प्राधान्य द्यावे अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवसभर हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक औरंगाबाद वेब संपादक नीलेश जोशी यांनी केले. सूत्रसंचालन प्राची पाटील यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीतील हिंसक आंदोलक; अण्णा हजारेंनी मांडलं ‘हे’ सडेतोड मत!
- विदर्भाचा मागासलेपणा गोसीखुर्दच्या पाण्याने धुऊन काढणार; मुख्यमंत्र्यांचे विदर्भवासीयांना आश्वासन
- ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात संगनमत करून आर्थिक लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल करा- मनसे
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची ‘बी’ टीम; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
- शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

