Share

महाभारताचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र

Published On: 

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल झाला.

कालच्या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत 17 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत.

यासंदर्भात बोलताना, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी लाल किल्ला अपवित्र केला, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे. तर, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ‘दुर्योधना’चा उल्लेख करत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

‘जी शंका होती, ते खरे ठरले. शेतकरी संघटना मोठ-मोठ्या गप्पा मारत होत्या, की शिस्त राखली जाईल. आम्ही आनंदोत्सवात सहभागी होत आहोत. हा आनंदोत्सव होता, की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतावर हल्ला होता? यांनी लाल किल्ला अपवित्र केला आहे. यासंर्वांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी. एवढेच नाही, तर भडकावण्याचे काम तर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले. शेतकरी संघटनेचे नेते केवळ भडकावण्याचेच काम करत होते आणि आता घटना घडून गेल्यानंतर ते आपले ज्ञान पाझळत आहेत,’ असे शाहनवाज हुसैन म्हणाले आहेत.

यावर कॉंग्रेसकडून पलटवार करण्यात आला. ‘महात्मा विदूर यांच्या सारखे मंत्री, कृपाचार्यांसारखे राजगुरू, द्रोणाचार्यांसारखे महारथी आणि भीष्मांसारखे मार्गदर्शक असतानाही हस्तिनापूरचा सर्वनाश कसा झाला? कारण दुर्योधनाच्या अहंकारापुढे सर्व मौन राहिले आणि या मौनाची किंमत सर्वांनाच चुकवावी लागली’. असे म्हणत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी महाभारताचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!