नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली. मात्र भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने उधळत या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) वक्तव्य केलं आहे.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, आज भारताकडे पाहण्याचा जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगातील लोक भारताकडे अधिक मजबूत रूपाने पाहत आहेत. त्यासाठी आपल्या देशाला वेगाने पुढे नेणं आपल्यासाठी गरजेचे आहे. हा काळ नव्या संधी आणि नव्या संकल्पना यांना पुढे घेऊन जाणारा आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, भारताचा जीडीपी (GDP) २ लाख ३० हजार कोटींच्या आसपास आहे. सध्या भारताचे परकीय चलन साठा ६३० अब्ज डॉलर पार झाला आहे. २०१३-२०१४ मध्ये भारताची निर्यात २ लाख ८५ हजार कोटी इतकी होती. आज भारताची निर्यात ४ लाख ७० हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. गेल्या सात वर्षात आपल्या सरकारने ३ कोटी गरीबांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“दागिने उत्पादक कारखान्याद्वारे होईल १ लाख रोजगार निर्मिती”, सुभाष देसाईंची माहिती
“शरद पवारांकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव २० हजार धावा..”, राऊतांच्या ‘त्या’ टीकेला भातखळकरांचा टोला
फुसक्या व पोकळ अर्थसंकल्पातून युवकांची घोर निराशा; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची टीका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

