Share

“शरद पवारांकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव २० हजार धावा..”, राऊतांच्या ‘त्या’ टीकेला भातखळकरांचा टोला

Published On: 

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut) यांच्यावर भाजप नेते टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच वाईन उद्योगसंबंधी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपांनी ते चर्चेत आहेत. यावरच राऊतांनी सोमय्या आणि भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. आज त्यांनी अमित शाह यांचे पुत्र जय शाह(Jai Shah) यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमित शाह यांचे चिरंजीव असलेले जय शाह यांच्या आर्थिक विषयाबद्दल मी बोलणार नाही, पण त्यांना क्रिकेटचा काय अनुभव आहे, देशाचे क्रिकेट त्यांनी ताब्यात घेतले आहे. पण त्यांना क्रिकेटचा काय अनुभव आहे, हे भाजपने सांगावे. असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर (Atul Bhatkhalkar response to Sanjay Raut criticism) दिले आहे.

“संजय राऊतांचे आदर्श शरद पवार यांच्याकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव होता. २० हजार धावा, ५०० बळी घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.” असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी अशोक गर्ग कंपनीसोबत संजय राऊत आणि त्यांच्या दोन्ही मुलींनी पार्टनरशीप केली असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून भाजप आणि सेनेत शाब्दिक वार पहावयास मिळत आहे. मात्र या वादात अतुल भातखळकर यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे. कारण २०१० ते २०१२ काळात शरद पवार आयसीसीचे माजी अध्यक्ष होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!