Share

U19WC: भारतीय संघाचा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनल सामना

Published On: 

मुंबई : अंडर १९ चा भारतीय संघ आज दुसऱ्या सेमीफायनल साठी ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. कोरोना महामारीमुळे भारताची संघाला सुरुवातीला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आयर्लंडविरुद्ध जेमतेम 11 खेळाडू जमू शकले होते. मात्र चार वेळच्या चॅम्पियन भारताने दक्षिण आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव करून स्पर्धेची सुरुवात केली. भारतीय संघाने आता थेट सेमीफायनल गाठलय.

यश धूल भारतीय संघाची धुरा सांभाळत आहे. भारतीय संघाने स्पर्धेत ग्रुप मध्ये तीन सामने खेळले, जिथे त्यांनी ते सर्व सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलिया संघाने तीन सामने खेळले, ज्यात त्यांनी दोन जिंकले आहेत. आता भारताकडेही ऑस्ट्रेलिया इतका मजबूत संघ आहे. कोरोनाशी झुंज देत सर्व सामने जिंकून अंतिम चारमध्ये पोहोचल्यामुळे भारतीय संघाचे आत्मविश्वास वाढले आहे. भारत सलग चौथ्यांदा सेमीफायनल खेळणार आहे. भारताकडे धुल आणि रशीद व्यतिरिक्त हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, राज बावासारखे धडाकेबाज फलंदाज आहेत. कर्णधार धुलने पहिल्या सामन्यात ८२ धावा केल्या होत्या.

वर्ल्ड कपचा हा दुसरा सेमीफायनल सामना अँटिग्वा येथील क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारताने बांगलादेशला पराभूत करत तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धूळ चारत सेमीफायनल मध्ये जागा मिळवली होती. भारताने ४ वेळा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यामुळे हा नवीन भारतीय संघ सुद्धा सेमीफायनल जिंकत वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!