🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट निर्माते अमिताभ दयाल (Bollywood actor and filmmaker Amitabh Dayal ) यांचे आज सकाळी म्हणजेच बुधवारी पहाटे ४.३० वाजता निधन (passed away) झाले. गेल्या तेरा दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ५१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अलीकडेच अभिनेत्याची पत्नी मृणालिनी पाटील (Mrinalini Patil) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान ही बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अमिताभ दयाल यांनी अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम, संजय दत्त (Amitabh Bachchan, John Abraham, Sanjay Dutt) यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनय गेल्या १३ दिवसांपासून आजारी होते. अभिनेत्याच्या पत्नीनेच याबद्दल सांगितले आहे. त्यांना १७ जानेवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृणालिनी पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘आम्ही त्यांचा अंत्यसंस्कार फक्त मुंबईत करू’ अमिताभ यांचे संपूर्ण कुटुंब छत्तीसगडमध्ये राहतात.
अमिताभ दयाल यांनी २०१२ मध्ये ‘रंगदारी’ आणि २०१३ मध्ये ‘धुआं’ या चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम, संजय दत्त यांच्यासोबत ‘विरुद्ध’ चित्रपटात काम केले होते. या अभिनेत्याने २००० मध्ये मराठी दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केले, मात्र लग्नाच्या नऊ वर्षानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फुसक्या व पोकळ अर्थसंकल्पातून युवकांची घोर निराशा; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची टीका!
- नुसरत जहाँने यश दासगुप्तासोबतच्या दुसऱ्या लग्नाचे सांगितले सत्य, वाचा अधिक
- IPL २०२२: मेगा ऑक्शनसाठी ५९० खेळाडूंची नावे आणि १० संघांचे बजेट जाहीर
- “सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात आहे”, नवाब मलिकांचा टोला
- ‘मी सरेंडर होण्यासाठी कोर्टात जातोय’ – नितेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
