Share

“दागिने उत्पादक कारखान्याद्वारे होईल १ लाख रोजगार निर्मिती”, सुभाष देसाईंची माहिती

Published On: 

मुंबई: उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महत्वाची घोषणा केली आहे. नवी मुंबईतील म्हापे येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी टीटीसी औद्योगिक क्षेत्रात (TTC industrial area for Navi Mumbai) ८६०५३ चौरस मीटर भूखंड वितरित करण्यात आला असून एमआयडीसी संचालक मंडळाच्या बैठकीत भूखंड विकासाचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. अशी माहिती सुभाष देसाई यांनी (Industry Minister Subhash Desai) ट्वीट करत दिली आहे.

यामुळे देशातील रत्न आणि आभूषणे उद्योग उद्यान नमुनेदार पद्धतीने जेम्स व ज्वेलरी एक्सोर्ट प्रमोशन काऊन्सिलतर्फे विकसित केले जाणार आहेत. या ठिकाणी १३५४ दागिने उत्पादक कारखाने सुरू होतील,त्यामुळे १ लाख रोजगार उपलब्ध होणार (1 lakh jobs will be created through jewelery factory)आहेत. यासाठीच या ठिकाणी सुमारे १४ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, असा मला विश्वास आहे. असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

दरम्यान डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय़ आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात तसेच प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर येथील कारखाने इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत. अशी माहिती सुभाष देसाई यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

दरम्यान नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात उद्योग उभारण्यासाठी पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीने पुढाकार घेतला असून सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीने तयारी दर्शविली आहे. याद्वारे आदिवासी भागात सुमारे दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. येथे येणाऱ्या कंपन्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केली आहे. अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!