🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्थगिती नंतर सध्या त्याच्या रांचीतील फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे. धोनीची पत्नी साक्षी धोनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर माहीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत धोनीबद्दल अपडेट देताना दिसते. नुकताच साक्षीने धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
साक्षीने शेअर केलेल्या या व्हिडिओत धोनी आपल्या नव्या घोड्यासह धावताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आणि घोडा यांच्यात रेस सुरू असल्यासारखं वाटत आहे. मजबूत, जलद असं कॅप्शन साक्षीने या व्हिडिओला दिलं आहे. तसंच तिने शेटलँड पोनी आणि रेसिंग असे हॅशटॅगही दिले आहे.
https://www.instagram.com/p/CQBYaUqnx49/?utm_source=ig_web_copy_link
धोनीने शेटलँड पोनी जातीचा घोडा स्कॉटलंडहून त्याच्या फार्महाऊसवर आणला आहे. 2 वर्षांचा हा घोडा जगातल्या सगळ्यात लहान जातीच्या घोड्यांपैकी एक आहे. या घोड्याची उंची 3 फूटांच्या आसपास असते. शेटलँड पोनी जातीचा घोडा त्याच्या वेगासाठी नाही, तर सजावटीसाठी ओळखला जातो. या घोड्याची किंमत देखील खूप आहे.
महत्वाच्या बातम्या
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
- कोरोना प्रादुर्भावामुळे वॉर्नर आणि स्टॉयनीसची ‘या’ लीग मधुन माघार
- यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, इमाम-उल-हकने सांगितले ‘हे’ कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
