Share

महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ मात्र,अर्थचक्राला झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री

Published On: 

मुंबई : देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला कोरोनाचा सर्वाधिक फटका असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीत ‘महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र,अर्थचक्राला झळ बसू नये याची आम्ही काळजी घेतली. कोविडविरुद्धची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यात निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेणे सुरू आहे. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्याचे सुरु आहे. तर रुग्णास तात्काळ योग्य उपचार सुरु व्हावेत म्हणून टेलिमेडिसिन व टेलि आयसीयूवर भर देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठाही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ होत आहे. यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी योग्य तो अभ्यास व्हावा. कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे. त्यामुळे कोविड सुसंगत वर्तनावर कायमस्वरूपी भर देणार असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!