गुरुग्राम : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा हाहाकार झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अत्यंत गांभीर्याने घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले जात आहे. अशातच, हरियाणामधील एक अजब प्रकार सध्या चर्चेत आला आहे.
कोरोना काळात केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला असून आता चोरीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. आता एका चोराने चक्क रुग्णालयातच डल्ला मारला. मात्र, या चोराला आपण काय चोरतोय हेच माहिती नव्हतं. जेव्हा त्याला कळालं हे कोरोनाच औषध (व्हॅक्सिन) आहे, तेव्हा त्याने एका पिशिवीत चिट्ठी ठेवून पोलीस स्थानकाबाहेरच्या चहावाल्याकडे दिली. ती पिशवी चहावाल्याने पोलीस स्थानकात दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
झालं असं की, बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलमधून कोरोना लसीचे शेकडो डोस चोरीला गेले होते. यानंतर, अवघ्या बारा तासात सिव्हील लाईन ठाण्याबाहेर असलेल्या चहावाल्याकडे चोराने पिशवी देत हे डोस परत केले, अशी माहिती जिंदचे पोलीस उपायुक्त जितेंद्र खटकड यांनी दिली.
ठाण्याच्या मुंशींसाठी खाद्यपदार्थ आहेत, असा निरोप देऊन चोरट्याने पोलीस स्थानकासमोरील चहावाल्याकडे ही पिशवी सुपूर्द केली व तो पसार झाला. चहाच्या दुकानातील वृद्ध पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांकडे ती पिशवी देऊन गेला. त्यामध्ये कोविशील्डच्या 182 वाइल, तर कोवॅक्सिनचे 440 डोस होते. यासोबतच, त्यात एक चिट्ठी देखील होती. त्यात, ‘सॉरी मुझे पता नहीं था कि ये कोरोना कि दवाई है !’ असा मजकूर लिहिला होता.

पन्नास हजारांची रोकड जशाच तशी !
दरम्यान, या चोराने एका कपाटात ठेवलेल्या काही कागदपत्रांच्या फाईल्सही लंपास केल्या आहेत. मात्र तिथेच असलेली ५० हजारांची रोकड जशास तशी आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून चोराने रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरण्याच्या नादात कोरोना लशी चोरल्या असाव्यात, असा संशय डीएसपी जितेंद्र खटकड यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारसाहेब तुम्ही काही करू नका, नाहीतर तुमचे साखर कारखाने हवेतील ऑक्सिजन पण सोडणार नाहीत’
- निलेश लंकेंनी शब्द पाळला; बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी दिला
- राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
- सेवानिवृत्त धारकांचे महिन्याच्या पाच तारखेच्या पेन्शन करा- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले
- रुग्णांना जीवदान देणारी रुग्णालये निष्कळजीपणामुळे मृत्यूचे सापळे ठरू नयेत – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

