Share

ज्यादा भाडे दर आकारणार्‍या रुग्णवाहिकांवर परभणी आरटीओ कारवाई करणार

Published On: 

परभणी : जिल्हा प्रशासनाला आरटीओ कार्यालयाकडून ७ रुग्णवाहिका हस्तातरीत करुन दिलेल्या आहेत. तर उर्वरित काही रुग्णवाहिका नागरिकांची आर्थिक लूट सुरु केल्याची माहिती समाेर आली आहे. उद्यापासून जिल्ह्यातील ज्यादा भाडे दर आकारणाऱ्या रुग्णवाहिकावर कारवाई करण्याची मोहीम आरटीओ विभागाकडून राबवण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णवाहिका भाडे मागणाऱ्या रुग्णवाहिकाची माहिती नागरिकांनी तात्काळ परभणी येथील आरटीओ कार्यालयाला कळवावी. दिलेल्या भाड्याची पावती वाहनधारकांकडून न चुकता घ्यावी. कोणतेही पेशंटची वाहतूक केल्यानंतर भाड्याची पावती देणे जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिकाधारकांना बंधनकारक करण्यात येत आहे.याचे उल्लंघन करणार्ऱ्या व जादा भाडे आकारणार्‍या रुग्णवाहिकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.वेळप्रसंगी साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात येतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी प्रसार माध्यमाना बोलताना दिली आहे.

कोराना काळामध्ये अगोदरच खुप मोठया प्रमाणात आरोग्यांसह रुग्णालयांमध्ये, रुग्णांना खुप गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर या काळामध्ये सामान्य नागरिक तसेच रुग्णांना त्रास देणाऱ्या गोष्टी करु नये, अन्यथा आम्हाला तत्का‌ळ‌ कारवाई करावी लागले, कारवाईनंतर परिणामांना समोरे जाण्याची तयारी रुग्णवाहिका धारकांनी ठेवावी, अन्यथा आम्हाल कठोर पाऊले उचलाली लागतील. तर कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांसह सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, अशी कृती होणे अपेक्षीत आहे. त्यामुळे आता रुग्णवाहिका दर आकारणी हिशोबशिरपणे करावी, अन्यथा होणाऱ्या परिणामाला समोरे जावे लागणार असल्याचे आरटीओने इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!