🕒 1 min read
मुंबई : राज्यात २२एप्रिल रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. २२ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व अतिमहत्त्वाचे कारण वगळता कोणालाही बाहेर पडता येणार नाही असे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.
अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे. नागरिकांना काही महत्त्वच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे. काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असं आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.
आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात येत आहे.
आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: https://t.co/c2fxPS3Qzv
अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.
पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.#EPassForTravel
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 23, 2021
यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. हे काय आता नविन… काल परवापर्यंत नविन लॉकडाऊन नियमावलीत ई-पास वगैरे नसणार म्हणून सांगण्यात आलं. आता, अचानक या माहितीने अजून लोकांचा गोंधळ वाढणार आहे. एखादी व्यवस्थित हेल्पलाईन तरी सुरू करा, ज्याने लोकांना मदत होईल. राज्यात १७६० लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी ई-पास प्रणालीवरुन नाराजी व्यक्त केली आहे.
हे काय आता नविन….काल परवा पर्यंत नविन लॉकडाऊन नियमावलीत E-pass वगैरे नसणार म्हणून सांगण्यात आलं आता अचानक या माहितीने अजून लोकांचा गोंधळ वाढणार
एखादी व्यवस्थित हेल्पलाईन तरी सुरू करा ज्याने लोकांना मदत होईल
राज्यात १७६० लोक वेगवेगळं बोलताहेत ज्याने नुसता गोंधळ झालाय https://t.co/qVpFXjnuD5
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 23, 2021
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- राज्यात पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी ई- पासची गरज, महाराष्ट्र पोलिसांची माहिती
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
