Share

बीड येथे वाळू माफियांवर कारवाई; ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त

Published On: 

बीड: अवैध वाळू उपसा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरूच असतो तसेच वाळू माफियांचीही संख्या वाढतच आहे. अशातच तालुक्यातील सुर्डी शिवारात छापा मारून जिल्हा गौण, खनिकर्म विभागाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांन अटक करण्यात आली असून ५० ब्रास वाळू, एक मोठी व एक छोटी बोट, सक्षन पंप बुधवारी जप्त केला होते, याच परिसरात मुरूमाचेही उत्खनन करणारे पोकलेन, चार हायवा टिपर आढळून आल्याने या पथकाने वाहने जप्त करून तहसील कार्यालयात आणून लावली आहेत.

मांजरा नदीत पाणी साठा मोठ्या प्रमाणावर असल्याने वाळू माफियांनी एक मोठी व एक छोटी बोट आणून बोटीच्या मदतीने आणि सक्षन पंपाने वाळू उपसा करून नदीच्या कडेला साठा केला जात होता. त्यामुळे माळेगावचे उपसरपंच शरद दोडके यांनी जिल्हा गौण खनिकर्म विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी जिल्हा खनिज अधिकारी पी. एस. अर्सूल, माजलगावचे तहसीलदार वैशाली पाटील, जिल्हा गौण खनिकर्म विभागाचे अव्वल कारकून हर्षद कांबळे यांच्या पथकाने सुर्डी येथे छापा मारला.

पथकाने कारवाई करत ५० ब्रास वाळू, दोन बोटी व सक्षन पंप जप्त केला. दरम्यान, ही कारवाई सुरू असताना याच परिसरात विना परवाना मुरूम उत्खनन सुरू होते. या वेळी पथकाने या ठिकाणी छापा मारून चार हायवा टिपर, एक पोकलेन मशीन आढळून आल्याने ते जप्त केले. त्यानंतर केज येथील तहसील कार्यालयात आणून लावले. या कारवाईमुळे वाळू उपसा करणारे आणि मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!