नागपूर : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आधीच त्रस्त असलेला महाराष्ट्र, विविध अपघातांमुळे आणखी त्रस्त झाला आहे. भंडारा, नागपूर, मुंबई, नासिक नंतर आता विरारमध्ये अपघातामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यावर काँग्रसचे माजी खासदार विजय दर्डा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरोनापेक्षा जास्त रुग्ण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मृत्यू पावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या संदर्भात विजय दर्डा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये विरार मधील हॉस्पिटलच्या अंतर्गत जळालेल्या भागाची दृष्ये आहेत. यावर दर्डा यांनी लिहिले की, ‘महाराष्ट्रात हे काय सुरू आहे आणि इतक्या घटना घडत आहेत? लोक कारोना व्हायरसपेक्षा जास्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मृत्यूमुखी पडत आहे, असे कधी पर्यंत चालायचे? आज विरार मधील विजय बल्लभ कोव्हीड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आग लागल्याने १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.’
आखिर चल क्या रहा है महाराष्ट्र में और क्यों इतनी घटनाएं हो रही हैं? लोग कोरोना वायरस से ज्यादा सिस्टम की लापरवाही से मर रहे हैं, ऐसा कब तक चलेगा ? आज विरार में स्थित विजय बल्लभ कोविड हॉस्पिटल के #ICU में आग लगने से 13 लोगों की मृत्यु हो गयी! #VirarFire #VirarHospitalfire pic.twitter.com/ybt0ktyfKV
— Vijay Darda (@vijayjdarda) April 23, 2021
विजय दर्डा हे काँग्रेसचे माजी खासदार असून महाराष्ट्रातील मोठे उद्योजक आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या घटना सर्वांनाच विचलीत करणाऱ्या आहेत. आता काँग्रेसच्या माजी खासदारानेच महाराष्ट्रातील घटनांवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडी सरकारला ‘घराचा आहेर’च म्हणावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- राज्यात पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी ई- पासची गरज, महाराष्ट्र पोलिसांची माहिती
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


