मुंबई : आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या संसर्गामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर या स्पर्धेतील अनेक विदेशी खेळाडू हे मायदेशी परतले. तर काही खेळाडु हे अबुधाबी येथे पाकिस्तान प्रिमीअर लीग स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धाही काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
या स्पर्धेत अबुधाबी येथे शेख झायेद आंतरराष्ट्रीय मैदानावर ढाका ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी या संघादरम्यान एक सामना सुरु होता. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा फाफ डुप्लेसीस हा ढाका संघाकडुन खेळत होता. या सामन्यादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ढाका संघाचे क्षेत्ररक्षण सुरु असताना सातव्या षटकात त्याला ही दुखापत झाली. या सामन्यात लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडु अडवताना प्लेसीसने सुर मारत चेंडु अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी समोरुन येत असलेला सहकाही खेळाडु मोहम्मद हसनेनच्या गुडघ्यावर त्याचे डोके आदळले.
Faf du Plessis has been taken to the hospital for tests. He collided with M Hasnain during tonight’s PSL game. Get well soon, Faf ..
Two matches two major injuries first Andre Russell And now faf#FafduPlessis #QGvPZ #pzvsqg pic.twitter.com/jCjrkUjdqy— Teto Patiyaa ???????? (@Pola_620) June 12, 2021
या घटनेनंतर सामना काही काळ थांबवण्यात आला. नंतर डु प्लेसिसला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. याच स्पर्धेत क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड संघातील सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा अष्टपैलु खेळाडु आंद्रे रसेलला उसळता चेंडु लागला होता. त्यावेळी त्याला त्रास होत असल्याने त्यालाही जवळच्या दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूनंतर विकास गुप्ताचा मोठा खुलासा
- सर्व्हर डाऊनची समस्या; आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
- कोरोना प्रादुर्भावामुळे वॉर्नर आणि स्टॉयनीसची ‘या’ लीग मधुन माघार


