🕒 1 min read
जालना: आरटीई कोट्यातून जय विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना शाळांमध्ये मोफत कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी शाळेत प्रवेश निश्चितीचे संदेश येणार होते मात्र अजूनही कोणाला संदेश आलेला नाही. मात्र, रविवारी तिसरा दिवस असतानाही अद्याप संदेश मिळाले नाहीत. आता शाळा बंद, इतर कामे बंद असताना केवळ सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे पालकांना आरटीई कोट्यातील प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
आरटीई कोट्यातून मोठ्या इंग्रजी शाळांमध्ये मोफत कोट्यातून दिल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी यावर्षी २९९ शाळा पात्र ठरल्या आहेत. या शाळांतील मोफत कोट्यातून प्रवेश मिळावा यासाठी सोडत घेण्यात आली. यातून १ हजार ९१८ जणांची निवड केली, तर १ हजार १८१ जण प्रतीक्षेत आहेत. यासाठीची प्रक्रिया लॉकडाऊन हटल्यानंतरच सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला ११ जूनपासून सुरुवात करण्यात आली आहे. ११ जून रोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश निश्चितीचे संदेश प्राप्त होणार होते. याला दहा दिवसांची मुदत आहे. मात्र, रविवारी तिसरा दिवस असतानाही अद्याप संदेश मिळाले नाहीत.
ऑनलाइन माध्यमातून घेतली जाणारी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच राबवण्यात आली आहे. जून महिन्याअखेरीस सर्व प्रवेश निश्चित करण्याचे ध्येय होते. या अनुषंगाने प्रकिया राबवलीही, तर एप्रिल महिन्यात एकच सोडत घेऊन पात्र २९९ शाळांतील एकूण १ हजार ९१८ जागांवर प्रवेश घेण्याबाबत सोडतीतून संदेशही दिले. मार्चपासून कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रक्रिया राबवण्याचे नियोजनही होते. मात्र, लॉकडाऊन झाल्यानंतर प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे. याबाबत अद्याप सूचना प्राप्त झाल्या नसून निवड तसेच प्रतीक्षा यादीत पात्र असलेल्या पालकांनी पुढील आदेशाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
- कोरोना प्रादुर्भावामुळे वॉर्नर आणि स्टॉयनीसची ‘या’ लीग मधुन माघार
- यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, इमाम-उल-हकने सांगितले ‘हे’ कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
