परभणी: दोन भावांच नातं हे वेगळंच असतं, कधी भांडण तर कधी तेवढंच एकमेकांवर जीव लावणारं हे नातं असतं. लहान भावाचा जीव वाचवण्यासाठी मोठ्याने पाण्यात उडी घेतली, पाण्याचा अंदाज न आल्याने स्वतःचा जीव गमवावा लागला, ही घटना बुधवारी जिंतूर येथील बेलखेडा शिवारात घडली आहे. सोनाजी सूर्यवंशी (वय१८) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सध्या संचारबंदीमुळे शाळा तसेच महाविद्यालये बंद आहेत, त्यामुळे लहान मुलं खेळण्यासाठी तसेच तलावात पोहण्यासाठी जात आहेत. अकरावीत शिकत असलेल्या सोनाजी सूर्यवंशी त्याच्या सोबत त्याचा धाकटा भाऊ गजानन सूर्यवंशी आणि सोनाजीचा मित्र सिद्धार्थ घुगे, असे तिघे मिळून दुपारच्यावेळी बेलखेडा येथील तलावात पोहायला गेले होते. पोहत असताना अचानक सोनाजीचा धाकटा भाऊ पाण्यात बुडत असल्याचं सोनाजीला दिसले, लगेच त्याने त्याच्या दिशेने झेप घेतली, पण तेथील पाण्याच्या खोलीचा अंदाज त्याला न आल्याने तो पाण्यात बुडाला. सोनाजीच्या पाठोपाठ आलेल्या सिद्धार्थने आपल्या मित्राच्या धाकट्या भावाला सुखरूप वाचवले, मात्र सोनाजी पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती त्वरित सर्वत्र पसरली आणि तातडीने तेथील स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांचा पाण्यात बुडालेल्या सोनाजीचा शोध घेणे सुरु झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. या घटनेची पोलिसांत माहिती न दिल्याने कुठल्या प्रकारची नोंदणी येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली नाहीये.
महत्वाच्या बातम्या
- जिल्ह्यातील वाढीव संचारबंदीचा आदेश मागे घेण्याची भाजपची मागणी
- सर्वसामान्यांना अडचणीत टाकणारी कोणतीही भूमिका भाजपा खपवून घेणार नाही – दरेकर
- स्मार्ट सिटीसाठी मनपाच्या बजेटमध्ये ‘हि’ विशेष तरतूद
- महाराष्ट्रासाठी खुशखबर! नितीन गडकरींची मोठी घोषणा
- परभणी जिल्ह्यात जाहीर केलेले लॉकडाऊन रद्द करा, अन्यथा आंदोलन करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
