परभणी : संपूर्ण जिल्ह्यात पाच एप्रिलच्या सकाळपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी परभणी महापालिकेच्या सदस्यांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गुरुवारी केली आहे. या वेळी नगरसेवकांसह कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेले होते. तर लॉकडाऊन रद्द नाही केले, तर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतला आहे.
दरम्यान, संचारबंदीचा कालावधी वाढवल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध देखील केला. परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय शहरातील व्यापारी, शेतकरी तसेच हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुर, कामगारांवर उपासमारीची वेळ आणणारा आहे. असे देखील स्पष्ट केले. तर या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाने गेल्या वर्षभरापासून छोटे – मोठे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर जगण्याची सोय आधी करा, नंतरच लॉकडाऊन करा, असेही या वेळी निवेदनामध्ये म्हटले आहे.
या निवेदनावर अमोल जाधव, अॅड. सय्यद एजाज, अॅड. अभिजीत देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देखील स्वतंत्र निवेदन देण्यात आले आहे. त्यावर अॅड. माधुरी क्षीरसागर, शेख रियाजोद्दीन गौसोद्दीन, शेख अखिल शेख खलील, सय्यद अजहर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळी स्वाक्षऱ्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे – जयंत पाटील
- ‘नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली पण ‘ती’ घोडचूक कधी सुधारणार ?’
- दोन हजाराची लाच मागणारा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात!
- …म्हणून प्राजक्ता नंतर आता वीणा जगतापने सोडली ‘आई माझी काळुबाई’ मालिका
- आयपीएल २०२१ मध्ये ‘हे’ नवे विक्रम घडण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

