Share

महाराष्ट्रासाठी खुशखबर! नितीन गडकरींची मोठी घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वांच्या मार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची घोषणा केली आहे. रस्त्याचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांसाठी नितीन गडकरी यांनी निधीची घोषणा केली आहे. गडकरींनी महाराष्ट्रातील रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरणासाठी तब्बल २७८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

एकापाठोपाठ ट्विट करत नितीन गडकरी यांनी कोणत्या कामासाठी किती निधी जाहीर केला जात आहे याची माहिती दिली आहे. गडकरींनी प्रगतीका हायवे #PragatiKaHighway या हॅशटॅगखाली राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग कामांसदर्भात घोषणा केल्या आहेत.

गडकरींनी पुढील कामांना मंजुरी दिली आहे.
– राष्ट्रीय महामार्ग ३६१एफ वरील परळी ते गंगाखेड या मार्गासाठी २२४.४४ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील आमगाव ते गोंदिया मार्गाच्या विस्तारीकरणासाठी २३९.२४ कोटींच्या निधीला मंजुरी.

– नांदेड जिल्ह्यात येसगी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ६३ वरील मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी १८८.६९ कोटींचा निधी मंजूर.

– नागपूरमध्ये आरटी चौक ते नागपूर विद्यापीठ परिसरापर्यंत उड्डाणपूल आणि राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाडी/एमआयडीसी जंक्शन ४ पदरी उड्डाण पूल यांच्या कामासाठी ४७८.८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय.

– राष्ट्रीय महारमार्ग क्रमांक ७५३ वर २८.२ किलोमीटरच्या रस्त्यासह तिरोरा गोंदिया राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी २८८.१३ कोटींच्या निधीला मंजुरी.

– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६जी वरील तरेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर विस्तारीकरणासाठी १६७ कोटींचा निधी मंजूर.

– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर तिरोरा-गोंदिया भागामध्ये दोन पदरी मार्गासाठी २८२ कोटींच्या निधीला मंजुरी

– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२आय वरील वाटूर ते चारठाण परिसरात दोन लेनच्या विस्तारीकरण आणि पुनर्बांधणीच्या कामासाठी २२८ कोटींच्या निधीला मंजुरी.

– गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ३५३सी वरील २६२ किमी ते ३२१ किमी चे विस्तारीकरण आणि १६ लहान मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी २८२ कोटींच्या निधीला मंजुरी

– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ई वर गुहार-चिपळून मार्गावर विस्तारीकरणासाठी १७१ कोटींचा निधी मंजूर.

– जळगाव-भद्रावन-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३जे वरील रसत्याच्या चार पदरी विस्तारीकरणाच्या कामाला २५२ कोटींच्या निधीसह मंजुरी

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!