परभणी : परभणी जिल्ह्यात वाढीव संचार बंदीचा आदेश त्वरित मागे घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना परभणी येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यात २४ मार्चपासून सुरु असलेल्या संचारबंदीने जिल्ह्यातील व्यापारी, छोटे व्यापारी, शेतकरी, रोजंदारीवर पोट असणाऱ्या मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या संचारबंदीच्या काळात पण रुग्णसंख्येमध्ये घट न होता वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा परिस्थितीमध्ये पुरेशी आरोग्य सुविधा देण्यात भर द्यावा, आणि लागू केलेली संचारबंदी टाळण्यात यावी. या जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, इतर व अंतर्गत जिल्ह्यातील वाहतूकीवर 15 एप्रिलपर्यंत लावलेली ही बंदी ठीक आहे. पण संचारबंदी करून सर्वसामान्यांचे जगणे अवघड करू नये असे या निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीचा विचार करून परभणी जिल्ह्यातील लागू केलेली संचारबंदी त्वरित रद्द करून जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन परभणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, मनपा गटनेत्या मंगल मुदगलकर, मनपा सदस्य मधुकर गव्हाणे, माजी संघटन सरचिटणीस संजय शेळके, सरचिटणीस दिनेश नरवाडकर, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप जाधव, भाजपा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, महानगर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, सिकंदर खान, युवा मोर्चा सरचिटणीस आकाश लोहट, अनंता गिरी,आत्मनिर्भर भारत योजनेचे संयोजक गणेश देशमुख, राजेश बालटकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे – जयंत पाटील
- ‘नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली पण ‘ती’ घोडचूक कधी सुधारणार ?’
- दोन हजाराची लाच मागणारा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात!
- …म्हणून प्राजक्ता नंतर आता वीणा जगतापने सोडली ‘आई माझी काळुबाई’ मालिका
- आयपीएल २०२१ मध्ये ‘हे’ नवे विक्रम घडण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

