Share

सर्वसामान्यांना अडचणीत टाकणारी कोणतीही भूमिका भाजपा खपवून घेणार नाही – दरेकर

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात रात्री आठ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली असून मॉल्स, हॉटेल, चित्रपटगृहे व इतर दुकाने देखील रात्री आठच्या आधीच बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने लागू केले आहेत.

अशातच, पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सामान्यांसह उद्योजकांमध्ये काहीशी भीती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करताना लॉकडाऊनला विरोध केला आहे. ‘सर्वसामान्य जनता अडचणीत येईल अशी राज्य सरकारची कोणतीही भूमिका भाजपा खपवून घेणार नाही. सर्व सामान्यांच्या उदरनिर्वाहावर, पोटापाण्यावर गदा येईल असा कोणताही निर्णय भाजप खपवून घेणार नाही,’ अशी भूमिका स्पष्ट करत त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!