🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
दरम्यान, आसाम आणि प. बंगाल मध्ये दोन टप्प्यातील निवडणुका झाल्या आहेत यामध्ये काही गैरप्रकार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असं मध्ये एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले होते. महत्त्वाचे म्हणजे ज्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडले ती गाडी भाजपा उमेदवाराची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी विरोधकांनी भाजपावर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली होती.
यावरून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करत भाजप वर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान या प्रकरणातील ईव्हीएम मशीन सापडलेल्या भाजप उमेदवारावर प्रचार करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यांनतर हि बंदी 48 तासांऐवजी 24 तास करण्यात आली आहे. यावरून प्रियंका यांनी टीका केली आहे.
चुनाव आयोग से हम भाजपा नेता की गाड़ी में EVM मामले में कड़ी कार्रवाई का इंतजार कर ही रहे थे कि आयोग के एक और कदम से ऐसा लगता है कि उसने अपनी रुलबुक से निष्पक्षता वाला पेज फाड़के फेंक दिया है।
आखिर किस दबाव में धमकी देने वाले भाजपा नेता के बैन को 48 घंटे से घटाकर 24घंटे किया गया? https://t.co/ISBMCilBO7
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 3, 2021
त्यांनतर आता पुन्हा ट्वीट करत त्यांनी ‘निवडणूक आयोगाकडून भाजप नेत्यांच्या कारमधील ईव्हीएम प्रकरणातील कठोर कारवाईची आम्ही वाट पाहात आहोत, तेव्हा आयोगाच्या आणखी एका निर्णयाने पुस्तकातून निष्पक्षतेचे पान फाडून टाकले आहे. त्या धमकावणा भाजप नेत्याला घातलेली प्रचारबंदी कोणत्या दबावाखाली 48 तासांऐवजी 24 तास केली आहे.’ असा सवाल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खिलाडी कुमारला कोरोनाची लागण
- भीषण अपघात! कारने शिक्षक दांम्पत्यास नेले २०० फूट लांब फरफटत, दांम्पत्य जागीच ठार!
- ‘आनंद महिन्द्रांचा राज्यातील लॉकडाऊनला विरोध, पण मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळय़ा पिटण्याचा आनंद साजरा केला होता’
- दिल्ली कॅपिटल्सनंतर आता धोनीच्या चेन्नई संघावर कोरोनाच सावट
- स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ‘ही’ सेवा आज राहणार बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
