Share

भीषण अपघात! कारने शिक्षक दांम्पत्यास नेले २०० फूट लांब फरफटत, दांम्पत्य जागीच ठार!

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून अपघाताचे प्रमाण सतत वाढत आहे.छोट्या मोठ्या अपघातासह भीषण अपघात झाल्याच्या ही घटना आहेत. अशीच एक घटना काल कळंब येथे घडली. भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने शिक्षक दांम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आंदोरा गावानजिक घडली.

याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार एक महिला चालवित असल्याची चर्चा असून शिक्षक दांम्पत्याच्या दुर्देवी मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुधीर विश्वनाथ लोमटे व त्यांची पत्नी अनिता लोमटे हे कळंब-येरमाळा रस्त्याने दुचाकीवरून जात होते. दरम्यान येरमाळाकडून भरधाव वेगातील आलेल्या कारने त्यांना धडक देत तब्बल २०० फूट लांब फरफटत नेले.

दरम्यान ती चारचाकी गाडी महिला चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. चारचाकीने इतका जोराने धडक दिली की शिक्षक दाम्पत्य खाली पडले आणि त्या चारचाकीने त्यांना तब्बल २०० फूट फरफटत नेले. या भीषण अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अपघातसत्रामुळे नागरिकात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!