Share

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ‘ही’ सेवा आज राहणार बंद

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बँक ग्राहकांना नेहमीच काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागते यामध्ये कधी बँकांना सुट्ट्या असतात तर कधी बँक प्रणाली सुरु नसल्याने ग्राहकांचे आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. आज देखील स्टेट बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म वापरताना अडचणी निर्माण होणार आहेत.

आज एसबीआय ग्राहकांना 2 तास एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा वापरता येणार नाही. कारण बँक आज अपग्रेड करण्याचे काम करीत आहे. एबीआयने याबद्दल ट्वीटद्वारे सतर्क केले आहे जेणेकरुन ग्राहक त्यांच्या महत्त्वपूर्ण काम लवकर करून घेतील आणि त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.

एसबीआयने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 4 एप्रिल रोजी दुपारी 3.25 ते सायंकाळी 5.25 या वेळेत बँक राहिल. दुरुस्तीच्या कामामुळे ग्राहक दोन तास इंटरनेट बँकिंग, योनो अॅप योनो लाइट आणि यूपीआय वापरू शकणार नाहीत. म्हणूनच, तुमची महत्त्वाची कामं वेळीच पूर्ण करा. तसेच ‘आम्ही आमच्या सन्माननीय ग्राहकांना विनंती करतो की आम्ही बँकिंगचा चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा त्यांनी या कठीण काळात आमच्याबरोबर राहावे. आपणास होणार्‍या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आमच्याबरोबर राहण्याची विनंती करतो.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!