Share

खिलाडी कुमारला कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.

या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. बॉलिवूडच्या खिलाडी कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली आहे. आज सकाळी अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अक्षय कुमार ट्विट करून म्हणाला, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. माझ्या संपर्कात जे आले आहेत त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी’ असे आवाहन देखील अक्षय कुमारने केले आहे.

दरम्यान, राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!