Share

मोदींच्या नेतृत्वात देशाने धीर आणि संयम बाळगत असुररुपी कोरोनावर विजय मिळवला-चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई: नरक चतुर्दशीनिमित्त सर्वच राजकीय पक्षाकडून देशवासियांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

नरकासुराचा वध करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची आठवण म्हणून नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर कारीट फोडण्याची प्रथा आहे. . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात समस्त देशवासियांनी धीर आणि संयम बाळगत असुररुपी कोरोनावर असाच विजय मिळवला आहे. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

तसेच नरकचतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून १६ सहस्त्र महिलांचे संरक्षण केले, म्हणूनच आजचा दिवस हा वाईटावर मांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. संरक्षणक्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी मोदी सरकारने उचललेले पाऊल ऐतिहासिक असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!