उस्मानाबाद : महावितरणचा मनमानी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आधी थकीत पैसे भरा मगच डीपी लावतो असा अजब फर्मान महावितरण कडून सोडल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील उंडरगाव येथील वॉटरसप्लाईचा विद्युत डीपी वीस दिवसापूर्वी जळाला असून अद्यापही डीपी दुरुस्ती करुन न मिळाल्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. घडाभर पाणी मिळवण्यासाठी भर उन्हात कोसोदूर भटकंती करावी लागत आहे.
महावितरण कंपनीकडून अगोदर शेतकऱ्यांना वीज बील भरायला सांगा त्यानंतरच डीपी मिळेल असे सांगितले जात असल्याने नागरिकातून महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील गावाला पाणीपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर गेल्या २० दिवसापूर्वी जळाल्याने पाण्यासाठी येथील नागरिकांना कामधंदा सोडून वणवण भटकंती करावी लागत आहे. या बाबत उंडरगाव ग्रामपंचायतीने लोहारा महावितरण कंपनीकडे जळलेला डीपी दुरुस्ती करुन तात्काळ मिळावा अशी मागणी करुनही डीपी मिळत नसल्याने नागरिकांना मिळेल तेथुन पाणी उपलब्ध करून आपली तहान भागविण्याची वेळ आली आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. आधीच कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावत असून त्या भितीपोटी नागरिक घरात बसून आहेत. त्यात वीस दिवसांपासून पिण्याकरीता पाणी मिळत नसल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. वीज बील भरण्याच्या नावाखाली वॉटर सप्लायचा डीपी मिळेना. या डिपीवरुन काही शेतकऱ्यांना कनेक्शन दिले आहे.थकीत शेतकऱ्यांना वीजबिल भरणा करायला सांगा तरच डीपी बसवू अन्यथा नाही अशी भूमिका महावितरण कंपनीकडून घेतली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेड – बंगळुरू, ओखा – रामेश्वर उत्सव विशेष रेल्वेला दिली मुदतवाढ
- एकदिवसीय सामन्यांत शिखर धवन सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा बळी
- ‘या’ गावात मिळणार पाच रुपयात २० लिटर पाणी !
- एन व्ही रामण्णा नवे सरन्यायाधीश ? शरद बोबडेंकडून शिफारस
- अभिनेता अजय देवगणनं बदललं स्वतःचं नाव?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

