🕒 1 min read
औरंगाबाद: ग्रामीण भागातील महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी उमेद प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होईल तसेच महिलांना सक्षम आणि स्वावलंबी होण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल. ‘उमेद प्रकल्प’च्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि पयार्याने राज्यातील महिला अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनतील असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उमेद प्रकल्पाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. उमेदच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रकल्प राबवावे ज्या माध्यमातून महिला अधिक सक्षम होतील. बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळेचा उपयोग करावा. शनिवारी शाळा संपल्यानंतर आणि रविवार पुर्ण दिवस असा दिड दिवस त्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी माहिती सत्तार यांनी दिली.
तसेच पैठणी साडी तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी अजिंठा परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या माध्यमातून र्स्त्रीयांना रोजगार उपलब्ध होईल. आदर्श ग्रामीण विकास सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून पुढील ३ वर्षांत ५ हजार महिलांना रोजगाराच्या संधी उपलबध करुन देण्यात येतील. जिल्ह्यातील विविध उद्योगांकडून सीएसआर मिळवून त्याचा उपयोग महिलांना उद्योग उभारण्यासाठी करावा असेही राज्यमंत्री सत्तार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- लातूर येथे उभारले देशातील पहिले ऑटिजम सेंटर! जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची हस्ते उद्घाटन
- अनिल देशमुखांना १० बार मालकांनी चार कोटी रुपये दिले ;EDची माहिती
- औरंगाबादेत शुक्रवारी तब्बल १७ हजार जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण!
- कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली
- यादीतील उमेदवारांची २०१८ पासून ‘प्रतिक्षा’ संपेना, आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
