Share

औरंगाबादेत शुक्रवारी तब्बल १७ हजार जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण!

Published On: 

औरंगाबाद : २२ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु झाले आहे. यामुळे तरुणांच्या उत्साहाने लसीकरणावर आलेली मरगळ झटकून लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (दि.२५) शहरात १७ हजार जणांनी लस घेत विक्रमी लसीकरण प्रस्थापित केले. १८ प्लस नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादाने मनपा प्रशासनाने ७७ लसीकरण केंद्र सुरु केले असून येत्या काळात यात आणखी वाढ करणार असल्याचे आरोग्य विभागाद्वारे सांगण्यात आले. प्रोझोनच्या पार्किंग मध्येही ड्राइव्ह इन लसीकरण, पायी येणाऱ्यांचे लसीकरण सुरु आहे.

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे २१ जूनपासून लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र राज्य सरकारने लसींची उपलब्धता विचारात घेऊन ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले होते. त्यानंतर लसींची संख्या वाढल्याने राज्य शासनाने नव्याने आदेश काढत २२ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु केले आहे. यात पहिल्याच दिवशी (दि.२३) १२ हजार २३० जणांचे लसीकरण झाले तर दुसऱ्या दिवशी १४ हजार ६७ जणांनी लस घेतली.

२५ जून रोजी तब्बल १७ हजार जणांनी लस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सुरुवातीला लसींची उपलब्धता नसल्याने लसीकरणाची संख्या कमी होती. त्यानंतर मात्र दुसरी लाट ओसरली आणि नागरिकांची लसीकरण करून घेण्याची इच्छा देखील नाहिशी झाली. मनपाकडे ५० हजार लसी उपलब्ध असतानाही लसीकरणाची गती मंदावली होती. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाल्याने औरंगाबादेत लसीकरणाची गती वाढत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!