🕒 1 min read
लातूर: लातूर येथे देशातील पहिले ऑटिजम सेंटर सुरू करण्यात आले आहे. समाज कल्याण विभाग व सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर उभारण्यात आले आहे. या ऑटिजम सेंटरचे (स्वमग्नता उपचार व पुनर्वसन केंद्र) चे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे, अमित देशमुख, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व इट मान्यवर उपस्थित होते.
स्वमग्नता व तत्सम आजारांवर योग्य निदान व उपचार करून अशा बालकांचे पुनर्वसन मोफत करणारे हे देशातील पहिले सेंटर असून, हे सेंटर अत्यानुधिक सोयी सुविधांनी युक्त आहे. सामाजिक न्याय विभागाची धुरा विकासाभिमुख व्यक्तीच्या हाती असल्याचा आनंद हे केंद्र पाहिल्यानंतर होतो आहे, अशा शब्दात जयंतराव पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाच्या या अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.
स्वमग्नता, बहुविकलांगता, अतिचंचलपणा यांसारखे आजार कायम स्वरूपी नसून, त्यांचे वेळीच निदान करून योग्य उपचार केल्यास त्यावर सहज मात करून संबंधित बालक सामान्य जीवन व्यतीत करू शकते, याचाच विचार करत लातूरच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटिजम सेंटर उभारण्याचे ध्येय धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. या आस्थापनेचे उद्घाटन होण्यापूर्वीच इथे वेगवेगळ्या आजारांची ५०० मुले दाखल असून त्यातील काही मुले योग्य उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन घरी देखील गेले असल्याची माहिती सीईओ अभिनव गोयल यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना १० बार मालकांनी चार कोटी रुपये दिले ;EDची माहिती
- औरंगाबादेत शुक्रवारी तब्बल १७ हजार जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण!
- कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली
- यादीतील उमेदवारांची २०१८ पासून ‘प्रतिक्षा’ संपेना, आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा
- गरोदर मातांसाठी आनंदाची बातमी ! यापुढे मनपाच्या रुग्णालयांमध्ये होणार मोफत चाचण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
