Share

नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद चिघळला; दि. बा. पाटलांच नाव दिलं नाही तर १५ ऑगस्टनंतर…

Published On: 

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीने जोर पकडला आहे. अनेक समाजिक संघटना आणि स्थानिक नेते ही मागणी करताना दिसून येत आहेत. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना नवी मुंबईतील स्थानिक दि बा पाटील यांच्या नावावर ठाम आहेत. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज (24 जून) सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात आलं. येत्या 15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर 16 तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

या आंदोलनात नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली अशा विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी झाले. यावेळी सिडको अधिकाऱ्यांना आंदोलकांकडून एक निवेदन देण्यात आलं. ‘विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्यावे’, असे निवेदनात म्हटलं आहे. तसंच 15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दिबांचे नाव नक्की करा अन्यथा 16 ऑगस्टपासून विमानतळाचे काम चालू देणार नाही’, असा इशारा कृती समितीतील आंदोलकांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!