Share

प्रसेनजीत पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्यामुळे बुलढाण्यातील राजकीय समीकरणे बदलणार ?

Published On: 

मुंबई  – कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृ. उ. बा. समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी काल असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

स्वगृही परतलेल्या प्रसेनजीत पाटील यांच्या येण्याने बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून एक जागा भक्कम झाल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही यावेळी केले.

दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष स्वबळाची भाषा करत असताना इतर दोन पक्षांनीही आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीनं एकत्र येऊन महापौरपदाची निवडणूक लढण्याचं ठरविल्यानंतर आता बुलडाण्यात राष्ट्रवादीला मोठं बळ मिळालं आहे. दांडगा जनसंपर्क असलेले पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे बुलढाण्यातील राजकीय समीकरणे बदलतील अशी देखील शक्यता आहे. पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर आणखी काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी देखील शक्यता आहे.

दरम्यान, प्रसेनजीत पाटील यांच्या प्रवेशाने विदर्भात पक्षाला अधिक बळकटी मिळणार आहे. आगामी सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहीजे अशा जोमाने राष्ट्रवादीने काम करायला सुरुवात केली असल्याचे देखील या पक्षप्रवेशामुळे दिसून येत आहे. दरम्यान, पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर आता पक्ष त्यांच्यावर काय जबाबदारी सोपविणार आणि ते ही जबाबदारी नेमकी कशी पार पाडणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!