🕒 1 min read
नवी दिल्ली: युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. रशियाची लष्करी ताकद युक्रेनच्या मनाने प्रचंड आहे. रशियाचे लष्कर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे लष्कर आहे. जगातील सर्वात ताकदवान लष्कर हे अमेरिकेचे आहे. तर युक्रेनचे सैन्य जगातील बाविसावे (२२) सर्वात मोठे लष्कर आहे. रशियाच्या या बलाढ्य आणि अवाढव्य लष्कासमोर युक्रेनच्या सैन्याचा टिकाव लागणे प्रचंड कठीण आहे. रशियाच्या बलाढ्य लष्करासमोर टिकाव लागणे कठीण वाटत असल्यानेच युक्रेनच्या सामान्य नागरिकांनी पण आता शस्त्र हातात घ्यायला सुरुवात केली आहे.
त्यातच आज युक्रेनमधील एका खासदाराने हातात शास्त्र घेतल्याचा फोटो समोर आला आहे. व्योतोस्लाव युराश असे युक्रेनच्या खासदाराचे नाव आहे. रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनधील परिस्थिती बिकट झाली आहे, म्हणूनच युक्रेनच्या सैन्याला मदत करण्यासाठी तिथले सामान्य नागरिक आणि काही लोकप्रतिनिधी पण मैदानात उतरले आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा देश सोडण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार देत राजधानीतच राहण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे युक्रेनमधील प्रत्येक नागरिक आता रशियासोबत लढण्यास तयार झाला आहे.
त्यातच आज व्योतोस्लाव युराश नावाच्या खासदाराने आता शस्त्र हाती घेतली आहेत. भारत आणि युक्रेनचे खासदार व्योतोस्लाव युराश यांच्यात एक खास नाते आहे. व्योतोस्लाव युराश हे भारत-युक्रेन फ्रेंडशिप ऑर्गनायझेशनचे प्रमुखही आहेत. काही वर्षे ते कोलकाता येथे वास्तव्यासही होते.
महत्वाच्या बातम्या :
- ‘नवाब मलिक जेलमध्ये आहेत, मग अजित पवार…?’ असदुद्दीन ओवैसींचा सवाल
- भारतीय लष्कर जगातील काही ताकदवान लष्करापैकी एक; असे आहेत क्रमांक
- युक्रेनच्या महिला खासदाराने उचलले शस्त्र! म्हणाल्या, “मला कधीच वाटलं नव्हतं की…”
- “मला दारूगोळा हवा, पळून…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला
- “यशोमती ठाकुरांनी मनोरुग्णांचे उपचार करून घ्यावे”, मोठी बहिण म्हणत नवनीत राणांचा सल्ला


