Share

‘नवाब मलिक जेलमध्ये आहेत, मग अजित पवार…?’ असदुद्दीन ओवैसींचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने ३ मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत तसेच मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यामू राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना त्यात आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी उडी घेतली आहे.

ओवैसी सध्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचारसभेमध्ये शनिवारी बोलताना ओवैसींनी समाजवादी पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. महाराष्ट्रात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात जलसिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. ते बाहेर आहेत आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. काय होतंय हे? असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.

राज्यात राजकारण वेगळ्या वळणावर गेलेले असताना आता त्यात आणखी भर ओवैसी यांनी केलेल्या या व्यक्तव्यामुळे होणार का, अशी चर्चा होत आहे. नवाब मलिक अटक प्रकरणी आता पुढे काय होणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यात आता महाविकास आघाडी मधील आणखी कुठल्या नेत्यावर कारवाई होणार याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!