Share

 भारतीय लष्कर जगातील काही ताकदवान लष्करापैकी एक; असे आहेत क्रमांक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधील युद्धाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. रशियाचे लष्कर युक्रेनच्या लष्करापेक्षा कित्येक पटीने ताकदवान आहे. युक्रेनच्या लष्कराचा रशिया समोर टिकाव लागणे महत कठीण आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्धामुळे जगातील कोणती लष्करी ताकद सर्वात मोठी आहे आणि कोणती नाही याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेन मधील अनेक सामान्य लोकांना जीव गमवावा लागत आहे. युक्रेनच्या तुलनेत रशिया प्रचंड शक्तिशाली आहे. त्यामुळे लवकरच रशिया युक्रेनवर ताबा मिळवेल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ग्लोबल फायरपॉवर या सामरिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने जगातील सर्वात ताकदवान लष्करांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीनुसार अमेरिकेचे लष्कर जगातील सर्वात ताकदवान लष्कर आहे, तर आक्रमक रशियाचा नंबर हा दुसरा आहे. भारताचा शेजारील आणि आशिया खंडाला डोकेदुखी ठरणारा चीन लष्करी ताकदीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपले भारतीय लष्कर पण जगातील सर्वात शिस्तबद्ध आणि ताकदवान लष्करापैकी एक आहे. आपल्या भारतीय लष्कराचा जगात चौथा क्रमांक लागतो. भारताच्या खालोखाल जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स. इंग्लंड, पाकिस्तान आणि ब्राझील या देशांचा क्रमांक लागतो. जगातील सर्वात दुसरे ताकदवान लष्कर असलेल्या रशियाशी २२ व्या क्रमांकावर असणार युक्रेन सध्या सामना करत आहे. रशियाच्या बलाढ्य सैन्यासमोर युक्रेनचा टिकाव लागणे प्रचंड अवघड आहे.

  महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!