🕒 1 min read
अमरावती: खासदार व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मतदार संघातील शिरजगाव मोझरी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजनात खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर (MP and Guardian Minister Yashomati Thakur) यांच्यावर निशाणा साधला.
यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद डोक्याच्या वर गेलं आहे. त्यामुळे माझा काळजी आणि मोठी बहीण म्हणून त्यांना एक सल्ला आहे की, त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन मनोरुग्णांचे उपचार करून घ्यावे. त्यांच्याकडे चुकीच्या पद्धतीने मंत्रीपद गेलं, आता त्यांना सहन होत नाही. त्यामुळे आपल्या डोक्याचा उपचार करून घ्यावा. असा सणसणीत टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.
तसेच दहा-बारा वर्षे त्या माझ्यापेक्षा मोठ्या असतील. रवी यांना यांच्यापेक्षाही त्या मोठ्या आहेत. मोठ्यांचा आम्ही आदर करतो. मोठ्यांचा आम्ही कधी अपमान करत नाही. त्यांनी काळजी घ्यावी, या उद्देशानं मी त्यांना सल्ला देते की, त्यांनी सायको ट्रीटमेंट डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्यावी. कारण येणाऱ्या काळात त्यांना याचा फायदा होणार आहे. असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“अशोक गावडेची जीभ छाटा”, अमृता फडणवीसांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ संतापल्या
-
‘माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे’ – संभाजीराजे भोसले
-
बीसीसीआयचा मोठा फैसला; तीन जणांची समिती साहा-पत्रकार धमकी प्रकरणावर चौकशी करणार
-
बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी राज्य शासनाकडून ३ कोटींचा निधी मंजूर; उदय सामंतांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
