Share

उजाला योजनेमुळे आतापर्यंत ४८ अब्ज युनिट्सपेक्षा जास्त वीज बचत झाली- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मोदी सरकारच्या नेतृत्वात सुरु असलेल्या प्रधानमंत्री उजाला योजनेमुळे आतापर्यंत भारतात ४८ अब्ज युनिट्सपेक्षा जास्त वीज बचत झाली असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत याबबत माहिती दिली आहे.

मोदी सरकारच्या नेतृत्वात सुरु असलेल्या प्रधानमंत्री उजाला योजनेमुळे देशातील गोरगरीब जनतेचे घर प्रकाशित होत आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात पथदिवे, ट्यूबलाइट आणि पंख्यांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय आतापर्यंत भारतात ४८ अब्ज युनिट्सपेक्षा जास्त वीज बचत झाली आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान देशात आतापर्यंत ११ दशलक्षहून अधिक पथदिवे लावण्यात आले आहेत. तर राज्यात ८.५० लाखांहून अधिक पथदिवे लावण्यात आले आहेत. तर देशात ७२ लाखांहून अधिक ट्यूबलाईट वितरीत केले आहे. हीच संख्या राज्यात ५.३१ लाख आहे. तसेच २३ लाख पेक्षा अधिक पंखे देशभरात उजाला योजनेतून वितरीत करण्यात आले आहेत. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!