🕒 1 min read
मुंबई : राज्यातील राजकारणात मागील एक महिनाभरात मोठ्या घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अनपेक्षित रित्या कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर दोनच दिवसांनी एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेत झालेल्या या बंडाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही. पक्षातील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी अजूनही शिंदे गटाच्या मार्गावर जात आहेत. दरम्यान या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुलाखतीला सामोरे गेले आहेत. शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेसोबत दगा फटका केलेल्या आमदारांना चांगलेच सुनावले आहे.
मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदार या सर्वांवरच चौफेर टीका केलेली पाहायला मिळाली. झाडाचा चढलेला पाला जसा गळून पडतो ते आपण प्रमाणे शिवसेनेतील पालापाचोळा गेला आहे. आता झाडाला नवीन पालवी फुटेल अशाप्रमाणे शिवसेना पुन्हा उभारी घेईल. गेला तो पालापाचोळा आहे. सडलेली पाने जळत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नाम घेता मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर भरपूर प्रेम होते त्यामुळे शिवसेनेचा पहिला झेंडा हा ठाण्यातूनच फडकला होता. त्याच ठाण्यातून बंड झाला? असे विचारले असता ठाकरे म्हणाले, जे गेले तो पालापाचोळा होता. ठाण्यातील सामान्य जनता आजही शिवसेनेसोबतच आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा मजबुतीने उभे राहील, असेही ठाकरे म्हणाले.
झडलेली, सडलेली पाने केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे का? यावर ठाकरे म्हणाले, सडलेली पाने झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळे काही मिळाले, रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती झाडाकडून सगळे घेऊनही गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसे झाले आहे हे दाखवायचा ते प्रयत्न करताहेत. मात्र, दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि जातो. झडलेली, सडलेली पाने केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे, आता नवीन कोंब फुटायला लागले आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : स्वतःच्या आईवडिलांना घेऊन मत मागवीत, माझे वडील का चोरताय ?, उद्धव ठाकरेंचा सवाल
- Udhdav Thackeray: “बाळासाहेबांचं नाव नाही घेतलं तर लोकं…”, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका
- Uddhav Thackeray : झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही का? उद्धव ठाकरेंचा शहाजीबापू पाटलांना सवाल
- Uddhav Thackeray : आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले…
- Shinde Government : शिंदे-फडणवीस सरकार धावतंय जोरात, २४ दिवसांत काढले तब्बल ५३८ जीआर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

