🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षाला मोठी खिंड पडली. या बंडामुळे पक्षातील अनेक मोठे नेते एकनाथ शिंदे यांना समर्थन करत शिवसेनेतून बाहेर पडले. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यांनी भाजपची हात मिळवून राज्यात सत्ता स्थापन केली. या घडामोडी दरम्यान शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर बंडखोर आमदारांनी कडाडून टीका केली होती. दरम्यान आता संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.
“तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचं नाव नाही घेतलं तर लोक तुम्हाला जोड्याने मारतील, म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेत आहात. हिम्मत असेल तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मागा. तुमच्या घाणेरडे राजकारणासाठी माझ्या वडिलांचा वापर करू नका. प्रत्येकाला ज्याचे त्याचे आई-वडील प्रिय असतात, आणि ते असायलाही पाहिजे. त्याचप्रमाणे मीही माझ्या आई-वडिलांना पुजतो मानतो. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावून मते मागावीत”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, आता शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये पक्षाच्या चिन्ह धनुष्यबाणाच्या हक्कासाठी संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे घाटाकडे आमदार व खासदारांची संख्या जास्त असल्याने त्यांच्याकडून चिन्हावर स्वतःचा दावा ठोकला जात आहे. तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहील असे ठणकावून सांगत आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण थेट निवडणूक आयोगाकडे पोहोचले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपापले म्हणणे मांडण्यासाठी तसेच कागदी पुरावे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले…
- Shinde Government : शिंदे-फडणवीस सरकार धावतंय जोरात, २४ दिवसांत काढले तब्बल ५३८ जीआर
- विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे शिक्षिकेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण; पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना
- Ajit Pawar : शिंदे – फडणवीसांच्या हातात जास्त काही नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार म्हणाले…
- Deepak Kesarkar | युवा सेना प्रमुख आता फिरायला लागले, या आधी ते कधीच दिसत नव्हते – दीपक केसरकर


