Uddhav Thackeray । मुंबई : आज शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलेला पाटील भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका
या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, या मुलाखतीत शिंदे गट बाळासाहेबांवर हक्क सांगतोय का, असा प्रश्न राऊतांनी विचारला असता, त्यावर उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला आव्हान दिलंय. ठाकरे म्हणाले, माझं आव्हान आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाने मातृ देवो भव, पितृ देवो भव हे मानलं पाहिजे. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत, मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय?, असा सवाल त्यांनी बंडखोरांना केलाय.
दरम्यान, या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटलांना देखील सवाल केलाय. झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही का? किती सुंदर आहे महाराष्ट्र. ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. मला एक कळलंच नाही की मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही, प्रेम नाही. त्या मातीचं वैभव दिसलं नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Udhdav Thackeray: “बाळासाहेबांचं नाव नाही घेतलं तर लोकं…”, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका
- Uddhav Thackeray : झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही का? उद्धव ठाकरेंचा शहाजीबापू पाटलांना सवाल
- Uddhav Thackeray : आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले…
- Shinde Government : शिंदे-फडणवीस सरकार धावतंय जोरात, २४ दिवसांत काढले तब्बल ५३८ जीआर
- विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे शिक्षिकेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण; पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना


