Share

Ramdas Kadam : “उद्धवजी तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना…” ; रामदास कदम ढसाढसा रडले

Published On: 

Ramdas kadam । मुंबई : काल माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवलं आहे. या पत्रात रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तर आज त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. तसेच यावेळी ते भावनिक देखील झाले.

यावेळी ते म्हणाले कि ‘शिवसेनेत आम्ही 52 वर्ष घालवली. तुम्ही भीक दिली असं कसं म्हणू शकतात. आम्ही शिवसेनेसाठी सर्वकाही केलं. उद्धवजी का तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना सोडत नाहीत,’ असा सवाल करताना कदम यांना आश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना सतत त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते. मागच्या 52 वर्षांत शिवसेनेसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी यावेळी माहिती दिले. तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं रामदास कदम यावेळी म्हणालेत.

दरम्यान, यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर देखील टीका केली. यानंतर आता पुन्हा एकदा एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. यावेळी कदम म्हणाले की, माझं वय 70 आहे. तरी मला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं. कारण ते ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे हे ‘मातोश्री’मधले आहेत. पण, अन्य कोणत्याही मंत्र्यांनी कसंही बोललं तरी चालतं. पण, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना असं बोलायला नको होतं, असंही रामदास कदम यावेळी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!