Share

Sanjay Raut | “आंधी नही, तुफान है मोदी…”; संजय राऊतांचा व्हिडीओ व्हायरल

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क : अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची असलेली युती २०१९ मध्ये तुटली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करत ‘महाविकास आघाडी’ या नावाने सरकार स्थापन केले. त्यानंतर मात्र भाजपने शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि शेवटी त्या प्रयत्नांना यश आलेच. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी बंड करत शिवसेनेला सुरुंग लावला आणि पुन्हा एकदा राज्यात भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. या राजकीय नाट्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत हे भाजपवर निशाणा साधण्यात ‘फ्रंट फूट’वर आहेत. यातच चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी राऊतांचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अशोक पंडित यांनी राऊत यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते “आंधी नही तूफान है मोदी, हिंदुस्थान की जान है मोदी”, असे म्हणत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पंडित यांनी लिहिले आहे की, “आम्हाला माहीत आहे आणि आम्ही आजही तेच बोलत आहोत, मात्र सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही विसरलात!”. यासोबतच त्यांनी संजय राऊत यांचा हार्मोनियम वाजवतानाचा फोटो शेअर करत “जय हनुमान ज्ञान गुण सागर”, असे कॅप्शन दिले आहे.

https://twitter.com/ashokepandit/status/1549078875468361729

या ट्विटवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या कॉमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “ते ही नवज्योत सिंग सिद्धूच्या रांगेत उभे आहेत”, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “पीडीपी आणि मेहबूबासोबत सत्तेत जाऊन भाजपने महान हिंदुत्व दाखवले होते”. तर नारायण कुमावत नावाच्या युजरने ठाकरे आणि राऊतांच्या मैत्रीचे कौतुक करत लिहले कि, “उद्धव ठाकरेंनी 40 आमदार आणि 14 खासदार सोडले, पण संजय राऊत यांना सोडले नाही..! आयुष्यात मैत्री असावी तर ती या शोलेसारखी असावी.” राहुल नावाच्या युजरने लिहिले आहे की, “लोकांना उद्धव ठाकरेंवर इतका राग नाही जितका संजय राऊत यांच्यावर आहे. त्यांनी संपूर्ण शिवसेना उद्ध्वस्त केली”. तर काही युजर्स असेही म्हणत आहेत कि, “हि तीच व्यक्ती आहे ज्याने संपूर्ण शिवसेना एकट्याने संपवली”. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय राऊत यांच्यावर अनेक देखील मीम्स बनवले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!