Share

Sanjay Raut PC : “नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री…”; संजय राऊत शिंदे गटावर संतापले

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut। मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सत्ता बदल झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून 40 आमदारांना वेगळं केलं. यानंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या माध्यमांतून समोर येत होत्या. त्यामुळे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली. आता शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. त्यात शिवसेना खासदार संसदेत वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले कि, नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे. उद्या कदाचित बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेलीच नाही असंही म्हणू शकतात. यांची वैचारिक पातळी इथपर्यंत गेली आहे की, शिवसेना आणि बाळासाहेबांचा संबंध नाही असंही विधान केलं जाऊ शकतं. शिवसेना भवन, सामना, मातोश्री डोक्यात असेल तर यांचे मेंदू तपासा, असं म्हणत राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, जे पक्षात आहेत तेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे यासंदर्भात कोणी वेगळी भूमिका घेतली तर याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई लढली जाईल असा इशारा दिला आहे. शिवसेना पक्षाची स्थापनाच ही संघर्षातून झाली आहे. त्यामुळे आमदार आणि खासदारांनी पक्ष सोडला शिवसैनिक हे बरोबर आहेत. त्यामुळे याचा काही परिणाम पक्षावर होणार नाही. ग्राउंड स्तरावर वेगळे चित्र आहे. शिवसैनिकांच्या जोरावर पक्ष पुन्हा उभारी घेईल यामध्ये शंका नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!