Share

जागा वाटपावरून उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येवून ठेपली आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. असे असले तरीही अद्याप शिवसेना आणि भाजपचे जागावाटप जाहीर झालेले नाही. त्यामुळे दोनही पक्षांना निवडणुकीच्या तयारीसाठी कमी वेळ मिळणार आहे.

शुक्रवारी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्रात भाजपमध्ये इन्कमिंग सुरू असल्यामुळे भाजपचा स्वबळाचा आत्मविश्वास वाढत असल्याने त्यांच्याकडून जागावाटपा संदर्भाच्या बोलणीवर काहीही हालचाल होत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी उद्विग्न होऊन प्रतिक्रिया दिली आहे. आता शिवसेनेच्या जागाही मुख्यमंत्री ठरवतील आणि ते मी पक्षासमोर ठेवतो असा टोला मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना त्यांनी ‘युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळी मी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवा फॉर्म्युला वापरण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेला द्यायच्या जागांची यादी तयार करावी आणि माझ्याकडे द्यावी. ती यादी नंतर मी आमच्या पक्षाच्या नेत्यांपुढे ठेवेन आणि त्यावर आम्ही चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावर एकमत न झाल्याने दोनही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती. त्यामुळे आताही अजून जागावाटपाचा निर्णय न झाल्याने २०१४ ची पुनरावृत्ती होते की काय अशी प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!