Share

शिवसेनेत स्किल पाहूनचं प्रवेश दिला जातो : आदित्य ठाकरे  

Published On: 

औरंगाबाद : शिवसेनेत सध्या इनकमिंग सुरु आहे, मात्र शिवसेनेत स्किल पाहून इनकमिंग होत असते, जेणेकरुन त्यांचा महाराष्ट्राला उपयोग होईल असे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगीतले. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले ठाकरे यांनी शनिवारी (ता.31) प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

जन आशिर्वाद यात्रेचा आज तिसरा टप्पा पूर्ण होत असून यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागात ही यात्रा गेली. 76 तालुक्यात 4 हजाराहून अधिक किलोमीटर जन आशिर्वाद यात्रा फिरुन आली आहे. गावांमध्ये जाउन, रस्त्यावर भेटणारी माणसे सर्वांना भेटून त्यांची मते, त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. लोक अडचणी सांगत आहेत, निवेदने देत आहेत. ही यात्रा राज्यात फिरत राहील यानंतर कोकण, पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाणार आहे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे पालघरमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. शिवसेना व भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंग विषयी ते म्हणाले, शिवसेना स्किल्डबेस इनकमिंग करत आहे. जे शिवसैनिकांत मिसळूक काम करु शकतील, ज्यांचा राज्यासाठी उपयोग होउ शकतो अशांचे इनकमिंग असल्याचे ठाकरे म्हणाले.

लोकादेश घेवून विधानसभा लढवण्याचा निर्णय

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. मला शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागदेखील आवडतो. वरळीमधून विधानसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यापुर्वीही दोन मतदारसंघातून मी विधानसभा लढवण्याची तिथल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने मतदारांचे आभार मानत असताना, त्यांची मने जिंकत असताना मी विधानसभा निवडणूक लढली पाहीजे किंवा नाही याविषयी जनतेची मते जाणून घेत आहे. लोकांचा आदेश घेउनच मी पुढे जाणार आहे. लोकांनी लढ म्हटले तरच मी लढणार आहे. कारण मतदार संघ हा आपली कर्मभुमी असते आणि संपुर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. यामुळे कसलाही भेदभाव न करता संपुर्ण महाराष्ट्रात काम करणार आहे.

कर्जमुक्ती होर्डिंगवरच बघतोय

राज्यापुढील सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता वाटतो यावर ते म्हणाले, सर्वात मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याहीपेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा आक्रोश या असल्याचे दिसले आहे. पिक विमा याजनेत फसवणुकच झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनीच यात त्रूटी असल्याचे मान्य केले आहे. शिवसेनेच्या दणक्यानंतर किमान 10 लाख शेतकऱ्यांना न्याय देवू शकलो असे कितीतरी शेतकरी आहेत ज्यांना पिक विम्याचे हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. पिक विमा याजनेत त्रूटी आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहीजे. कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने लढा दिला आणि सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. कर्जमुक्ती होर्डिंगवर बघीतली मात्र ती अजून गावांपर्यंत पोहचली नाही. संपुर्ण कर्जमुक्ती झाली असे म्हणणारा आतापर्यंत मला एकही शेतकरी भेटला नाही. हा मुद्दा सरकारच्या यश अपयशाचा नव्हे तर शेतकऱ्यांना न्याय मिळण्याविषयीचा असून मी सरकारकडे त्रुटी दूर करण्याबाबत विनंती करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगीतले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!