टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्री या निवासस्थानी जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भास्कर जाधव यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीला कोकणात मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं. ‘मी मूळचा शिवसैनिक आहे. माझा अंतरात्मा मला स्वस्थ बसू देत नव्हता. आपण शिवसेनेत काम केलं पाहिजे असं आतून वाटत होतं. त्यानुसार मी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला,’ असं जाधव यांनी यावेळी सांगितलं.
मागील अनेक महिने जाधव शांत होते. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असताना देखील त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत फारसे विश्वासात घेत जात नसल्याचे चित्र होते. नुकतीच त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन परत शिवसेनेत येण्याची ईच्छा व्यक्त केली होती. आज अखेर त्यांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे कोकणातही राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे.
जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे नदीजोड प्रकल्पाला मंजुरी
महेंद्रसिंग धोनी निवृत्ती कधी घेणार; बीसीसीआयचे स्पष्टीकरण
पुतण्याचा काकाला इशारा; …तर कपडे फाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

