🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा:- ग्रामीण भागात युवकांचे लग्न होत नाहीत, मात्र आता रोहितदादामुळे कोणाचंही लग्न राहणार नाही, असे वक्तव्य राज्यात छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील घनश्याम दराडे याने केले आहे. यानंतर सभामंडपात एकच हशा पिकला. कर्जत तालुक्यातील मांळगी येथे रोहित पवार यांच्या सृजन संस्था व मित्रमंडळाच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना तो पुढे म्हणाला, तरुणांच्या हाताला काम नक्की मिळणार हे रोहितदादा पवार यांचे वादळ कर्जत व जामखेड तालुक्यात आल्याचंही छोट्या पुढाऱ्याने यावेळी नमूद केले. याच सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, हे छोटे पुढारी नसून छोटे कलेक्टर आहेत आणि त्यांच्या भाषणामुळे फेमस आहेत आणि सिनेक्षेत्रात प्रसिद्ध आहेत ते कष्ठामुळे आणि हाच आदर्श युवकांनी समोर ठेवावा, प्रामाणिकपणे काम करताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये व युवकांमध्ये जाऊन काम करण्यास आवडते आणि मी जिंकण्यासाठीच निवडणुकीत उतरलो आहे असे ही ते यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यातर्फे आयोजित युवा महोत्सवाचा एकच चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलेले असताना रोहित पवार यांची कर्जत- जामखेड मधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
कॉंग्रेस नेत्यांच्या जाण्याने कार्यकर्ते खुश, साखर वाटून करणार आनंदोत्सव
प्रकाश आंबेडकर या वेळी नक्की कुणाची ‘वाजवणार’ ?
जीवनात एकदा तरी शिवसेनेचा आमदार व्हायचंय – पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

