मुंबई : योध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे काल भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.
भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.
त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादर, माहीम आणि वडाळा विभागातील सर्व शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिवसेनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याचे फोटोजही ट्विट्स केले आहेत. हे फोटो ट्विट करताना शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष प्रमुख इतकाच उल्लेख करण्यात आला आहे.
शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुख… pic.twitter.com/zmyDgBFOU0
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 17, 2021
काल शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना चोप दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी भाजपने पोलीस स्टेशन गाठलं होतं. तर, आज या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन त्यांच्या कौतुकाची पाठीवर थाप दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या कालच्या कृत्याचे उद्धव ठाकरेंकडून देखील समर्थन केलं गेलं असल्याच्या चर्चा होत आहेत. तर, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी ‘आमच्या अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, शिवसेना भवनावर वाकडी नजर कराल तर असंच उत्तर देऊ,’ अशा प्रतिक्रिया देत शिवसैनिकांचं कौतुक व समर्थन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- तिसरी लाट कधी ? राज्यातील कोरोना रुग्णांची आठ लाखांवर जाण्याची भीती – टास्कफोर्स
- ‘रोहित पवार हे शरद पवारांच नवं व्हर्जन; तेही पिढ्या मातीत घालवतील’
- ‘महाराष्ट्रातील जनतेचीही तीच इच्छा आहे…’; राष्ट्रवादीनेही केली आरपारच्या लढाईची तयारी?
- ‘अरे हा तर फारूख शेख’ ; हिमेशचा जुना फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया
- सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया ? शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

